Zp Bharati 2023 -
मित्रांनो तुम्ही जर स्पर्धा परिक्षेची तयारी करत असाल तर, तुमच्साठी आनंदाची बातमी आहे. Zp bharati 2023 जिल्हा परिषद भरती 2023 मार्फत अतिशय मोठी भरती करण्यात येणार आहे याबद्दलची आज आपण सविस्तर माहिती पाहणार आहोत तरी आपण हि संपुर्ण माहिती शेवटपर्यत पहा.
जिल्हा परिषद भरती 2023 मार्फत 13000 हजार पदांची भरती करण्यात येणार आहे.त्यामध्ये अंगणवाडी पर्यवेक्षिका, ग्रामसेवक, आरोग्यसेवक, विस्तार अधिकारी, अशी पदांच्या तब्बल 13000 जागांसाठी ही भरती होणार आहे.या भरतीची जाहिरात सुद्धा 11 एप्रिल रोजी जाहिर केली जाणार आहे.व्हिडियो कॉन्फरन्स च्या द्वारे आयुक्तांची जी बैठक झाली त्यामध्ये या भरतीची घोषणा करण्यात आली आहे.
2019 मध्ये ज्यांनी या भरतीकरिता अर्ज भरले होते याचीही माहिती आपण पाहणार आहोत.आयुक्तांनी शासनाकडून मार्गदर्शन मागवले आहे.जिल्हा परिषद पदभरतीच्या अनुषंगाने प्रशासन सज्ज झाले आहे म्हणजेच आता या जिल्हा परिषद भरतीला वेग येणार आहे.मात्र पेसा, अनुसुचीत क्षेत्र बाबत आलेल्या नव्या शासन निर्णयाने पुन्हा अडचण निर्माण झाली आहे.बिंदूनामावली आयुक्तांकडे मंजूरीसाठी पाठवण्यात आला आहे.मात्र आयुक्तांनी याबाबतचे मार्गदर्शन शासनाकडडेच मागवले आहे.
यामुळे जिल्हा परिषद भरती 2023 हि भरती होण्याकरिता जुन, जुलै उजाडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.म्हणजे तुम्ही form भरल्यानंतर तुमची जॉयनिंग पाच ते सहा महिने लागू शकतात.
सन 2019 जिल्हा परिषदेच्या विविध संवर्गातील पदभरती रद्द करण्यात आली.त्यानंतर नव्याने भरती करण्याचा निर्णय झाला आहे.जर तुम्ही 2019 ला तुम्ही जर फॉर्म भरला असेल तर ते पैसे जिल्हा परिषदेकडून परत मिळतील.आयबीपीएस कंपनीसोबतच करार करण्याचे सुरु आहे.आयुक्तांनी असे सांगितले आहे कि 10 एप्रिलपासून पुढे कधीही या भरतीची जाहिरात येऊ शकते.
तर अर्ज बोलावण्यापासून ते प्रत्यक्षात परिक्षा घेऊन निकाल जाहिर करणे आणि पात्र उमेद्वांना नियुक्ति ऑर्डर देण्यास जून ते जूलै महिनाच उजाडणार असल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट केले आहे.
प्रक्रिया अर्धवट ठेवणारी जिल्हा परिषद आऊट -
प्रक्रिया अर्धवट ठेवणारी जिल्हा परिषदेला आता आकृतीबंद, बिंदूनामावली चे काम ताबडतोब पूर्ण करा असे स्पष्ट आदेश जारी करण्यात आले आहेत.या आदेशानुसार कार्यवाही झाली नाही तर संबंधित जिल्हा परिषद पद भरतीच्या यादीमधून आऊट होणार आहे.ज्या जिल्हा परिषदेची भरतीची संपुर्ण प्रक्रिया पुर्ण झाली असेल अशाच ठिकाणी पद भरती घेण्यात येईल,असे संकेत आढावा बैठकित अधिकाऱ्यांनी दिले आहेत.
हे पण वाचा -
अशा प्रकारे या जिल्हा परिषद भरती 2023 ची जाहिरात लवकरच केली जाणार आहे.त्यामूळे तुमचा स्पर्धा परिक्षेचा अभ्यास या भरतीकरिता उपयोगी येणार आहे.
0 Comments